मुलीकडील विहीण l लग्नातील मुलीकडील विहीण l विहीण l Vihin l Mulikadil Vihin lLagnatil mulikadil vihin




आज वधू झाली मुलगी आज वधू झाली

सुविद्या कन्या सौआईची
प्रेमळ पुत्री पितश्रीची
तुम्हा आर्पली

आज वधू झाली मुलगी आज वधू झाली

माहेर सासर जोडील नाती
होईल लक्ष्मी तुमच्या घरची
पर गोत्री झाली

आज वधू झाली मुलगी आज वधू झाली

झाली कुलवधू सासूबाई ची
राहील सावली बनून पतीची
तुमचीच ती झाली

आज वधू झाली मुलगी आज वधू झाली

विहीन बाई विनंती तुम्हा
सांभाळून घ्या आमची कन्या
ओटीत ती घातली

आज वधू झाली मुलगी आज वधू झाली